Monday, March 31, 2014

निरांजनातले तूप

मनाच्या कोपऱ्यात, पडद्याच्या मागे,
दिसले एक निरांजन आणि काही रंगीत धागे.

लुकलुकत्या प्रकाशात भास झाला रांगोळीचा.
चमकले ताट-वाटी, त्यात घास श्रीखंड-पुरीचा.

ज्योतीची उंची वाढता, मनाचा कोपरा लखलखला.
कालनिर्णय स्पष्ट दिसले; निर्णयाचा काळ जवळ आला …

धाग्यांवर विश्वास टाकला अणि निर्णय दृढ केला.
निरांजनात तूप घातले तसा पडदाच नाहीसा झाला !!

मार्च ३१, २०१४ (गुढी पाडवा)

Tuesday, March 18, 2014