Monday, December 27, 2010

Tu Ek PahuNaa Ya Gharacha - Marathi Poem by Chandrika Ranade

This sobering poem by Chandrika Ranade reminds us all, that we are born with nothing, and shall die with nothing. All wealth, power, beauty, hubris is ephemeral.


तू एक पाहुणा या घरचा, मुक्काम घडीभर भूवरचा || ध्रु || 
आतिथ्य घेउनी झालासी, तू कृतघ्न घरच्या स्वामीसी ||
तुझ विसर कसा पडला त्याचा? || १ || तू एक पाहुणा ... 
या घरी रडत तू आलास, असहाय पांगळा होतास ||
उपकार आठवी स्वामीचा || २ || तू एक पाहुणा ... 
अभिमान रूप गुण शक्तीचा, अभिमान तुला धन दौलतिचा ||
जरी राजा असशिल दुनियेचा || ३ || तू एक पाहुणा ... 
या जन्मी करशिल सुकृत जे, तेव्हढेच रे येइल संगे ||
हा न्याय असे देवाघरचा || ४ || तू एक पाहुणा ... 
अंतरास आपुल्या तू शोध, हा साधू संतांचा बोध ||
चंद्रिकेस वाटे मोलाचा || ५ || तू एक पाहुणा ...

No comments:

Post a Comment